Thur, Feb 9, 2023

रामेश्वर विद्यामंदिराचे सुयश
रामेश्वर विद्यामंदिराचे सुयश
Published on : 18 January 2023, 9:44 am
मुंबई, ता. १८ ः मुंबई पश्चिम विभाग शिक्षण निरीक्षक आयोजित एच वॉर्ड विज्ञान प्रदर्शनामध्ये रामेश्वर विद्यामंदिर शाळेने दर वर्षीप्रमाणे यश प्राप्त केले आहे. विज्ञान प्रकल्प मोठा गटसाठी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या पोर्टेबल टॉयलेट या विज्ञान प्रकल्पाला प्रथम क्रमांक मिळून त्याची विभागीय पातळीवर निवड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विज्ञान प्रकल्प लहान गटसाठी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या सुरक्षित रेल्वे या प्रकल्पासाठी प्रथम क्रमांक मिळाला आहे. रामेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, मुख्याध्यापक यांनी सर्व सहभागी शिक्षक आणि विद्यार्थी यांचे अभिनंदन केले.