Fri, Feb 3, 2023

जेट टॉय स्पर्धेसाठी सरस्वती विद्यालयाची निवड
जेट टॉय स्पर्धेसाठी सरस्वती विद्यालयाची निवड
Published on : 18 January 2023, 9:46 am
मुंबई, ता. १९ (बातमीदार) ः महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने आयोजित केलेल्या मुंबई विभागातील एडब्ल्यूआयएम प्रकल्पांतर्गत शालेय स्तरावर जेट टॉय व स्कीमर बोट बनवण्याच्या स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये मुंबई विभागातील विविध शाळांमधून ४० गट सहभागी झाले होते. सरस्वती विद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकूण पाच चाचण्यांमधील वेग, अचूकता व वजन या तीनही चाचण्यांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. त्यामुळे सर्व शाळांमधून जास्त पारितोषिके मिळवल्याबद्दल विजेता म्हणूनही प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवून राष्ट्रीय स्तरावर त्यांची निवड झाली. स्पर्धेत सहभागी इयत्ता सहावीतील विद्यार्थी सम्राट तुरेवाले, गौरव तांबे, मोहिनी आदमाने व हर्षदा मस्के व मार्गदर्शक शिक्षक संजय डावरे यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.