Mon, Feb 6, 2023

स्वामी समर्थांच्या पादुकांची दर्शन परिक्रमा उत्साहात
स्वामी समर्थांच्या पादुकांची दर्शन परिक्रमा उत्साहात
Published on : 18 January 2023, 9:47 am
ठाणे, ता. १८ (बातमीदार) : स्वामी समर्थ सेवा मंडळ, सुसगाव पुणेतर्फे स्वामींच्या तेजस्वी मूर्ती आणि दिव्य पादुकांची परिक्रमा ठाणे रेल्वेस्थानकाच्या परिसरात आयोजित करण्यात आली होती. या परिक्रमेचे आयोजन ब्रम्हांडनायक मठ, सुसगाव पुणेचे व्यवस्थापक प्रसाद तामदार यांनी केले; तर ठाण्यातील परिक्रमेचे आयोजन आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली महेश विणेरकर आणि गीतेश माने यांनी केले. यासाठी रेल्वे प्रशासन, ठाणे महापालिका, पोलिस विभागाचे विशेष सहकार्य लाभले होते. ही परिक्रमा गाणगापूर, अक्कलकोट, पुण्यामध्ये पाच ठिकाणी पार पडली. शनिवारी ठाणे पूर्वमध्ये आनंद टॉकीजजवळ दर्शन सोहळा पार पडला. त्यानंतर रविवार आणि सोमवार ठाणे पश्चिममध्ये फलाट क्रमांक एकच्या जवळ सोहळा आयोजित करण्यात आला होता.