मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात दरवळणार ‘ओंजळीतील शब्दफुले’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात दरवळणार ‘ओंजळीतील शब्दफुले’
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात दरवळणार ‘ओंजळीतील शब्दफुले’

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात दरवळणार ‘ओंजळीतील शब्दफुले’

sakal_logo
By

वडाळा, ता. १९ (बातमीदार) ः मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय आणि शब्दांकन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ओंजळीतील शब्दफुले’ हा कवितांचा कार्यक्रम शनिवारी (ता. २१) सायंकाळी पाच वाजता दादर पूर्व येथील सुरेंद्र गावस्कर सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. यात विजय जोशी, चैत्राली जोगळेकर, मानसी चाफेकर हे कविता सादर करणार आहेत. या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त रसिकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे प्रमुख कार्यवाह रवींद्र गावडे व कार्याध्यक्ष शीतल करदेकर यांनी केले आहे.