विद्यार्थिनीं सक्षम होणे गरजेचे : डॉ. अर्चना पत्की | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थिनीं सक्षम होणे गरजेचे : डॉ. अर्चना पत्की
विद्यार्थिनीं सक्षम होणे गरजेचे : डॉ. अर्चना पत्की

विद्यार्थिनीं सक्षम होणे गरजेचे : डॉ. अर्चना पत्की

sakal_logo
By

विरार, ता. १८ (बातमीदार) : वेल ही झाडाच्या आधाराने वाढत जाते व कालांतराने झाडाच्या रूपात बहरते. तसेच प्रत्येक विद्यार्थिनीने झाडाप्रमाणे विशाल होऊन दुसऱ्यांना आधार द्यावा, इतके सक्षम होणे गरजेचे आहे. या सक्षमीकरणाच्या प्रवासात स्वावलंबनाचा प्रवास हा प्रत्येक विद्यार्थिनीला घडलाच पाहिजे. विद्यार्थिनींचा सर्वांगीण विकास हाच महाविद्यालयाचा ध्यास आहे, असे उद्‌गार सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमती मणिबेन एम. पी. शाह कला आणि वाणिज्य महिला स्वायत्त महाविद्यालयातील प्रभारी प्राचार्य डॉ. अर्चना पत्की यांनी काढले.
‘मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या’चे तिसरे पुष्प हे ‘प्रवास मराठीचा : प्रवास माणसाचा’ या व्याख्यानासाठी वाहिले गेले. या व्याख्यानाचे प्रमुख मार्गदर्शक सेंट जोसेफ कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा. जगदीश संसारे होते. त्यांनी सुरुवातीला मराठी भाषेचा प्रवास उपस्थितांसमोर मांडला. ते म्हणाले, प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात चांगले-वाईट अनुभव घेत आपल्या आयुष्याचा पल्ला गाठत जातो. हा पल्ला गाठण्यासाठी त्याला एक व्यक्ती म्हणून कुटुंब, मित्र-मैत्रिणी, समाज आणि राष्ट्र यांचे साह्य कसे मिळत जाते, हेही तितकेच महत्त्व आहे. व्यक्तीच्या प्रवासासोबतच त्या त्या स्थळांचाही प्रवास तितकाच महत्त्वाचा असतो, हे सांगताना ‘माझा प्रवास’ या गोडसेंच्या प्रवासवर्णनापासून ते ‘अपूर्वाई’, ‘साता समुद्रापलीकडे’ सारख्या प्रवासवर्णनांची काही उदाहरणे मांडून दाखविली. हे व्याख्यान अगदी खेळीमेळीच्या वातावरणात प्रा. जगदीश संसारे यांनी घेतले. विद्यार्थिंनींकडून लहान लहान उपक्रम घेऊन त्यांनी व्यक्तिमत्त्व विकासाचा प्रवास कसा गाठावा, हे मांडून दाखविले. हा कार्यक्रम महाविद्यालयाच्या मराठी विभागाने आयोजित केला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधवी पवार, तर आभार वैष्णवी बोबडे या विद्यार्थिनीने मानले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. हिरालाल भोसले उपस्थित होते.