ज्ञानेश्वर म्हात्रेंच्या प्रचारासाठी मुरबाडमध्ये मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ज्ञानेश्वर म्हात्रेंच्या प्रचारासाठी मुरबाडमध्ये मेळावा
ज्ञानेश्वर म्हात्रेंच्या प्रचारासाठी मुरबाडमध्ये मेळावा

ज्ञानेश्वर म्हात्रेंच्या प्रचारासाठी मुरबाडमध्ये मेळावा

sakal_logo
By

मुरबाड, ता. १८ (बातमीदार) : विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजप व बाळासाहेबांची शिवसेना युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रचारासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष गोटीराम पवार यांनी आयोजित केलेल्या मेळाव्याला मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी म्हात्रे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

शिक्षक मतदारसंघातून ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. मुरबाड तालुक्यात मोठ्या संख्येने शिक्षक मतदार आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी म्हसा येथे मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला तालुक्यातील शिक्षकांसह बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उपनेते प्रकाश पाटील, पक्षाचे आमदार शांताराम मोरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, माजी आमदार पांडुरंग बरोरा, जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय निमसे, मारुती धिर्डे, कांतीलाल कंटे, नंदकुमार मोगरे आदींची उपस्थिती होती.

--------------------
तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांत रस्ते, पाणीपुरवठा, कृषी, ग्रामपंचायत कार्यालये, स्मशानभूमी, दफनभूमी आदी विकासकामांसह दलित व आदिवासी बांधवांना सर्वोतोपरी साह्य करण्याचा प्रयत्न केला. या माध्यमातून अनेक गावांमध्ये पक्के रस्ते झाले. यापुढील काळातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपनेते प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुरबाड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी नमूद केले. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यासाठी प्रत्येक शाळेत पोहचून मते मागणार आहोत, असे पवार यांनी सांगितले.