ठाण्यात पाईपलाईन लीकेजच्या घटनांत वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्यात पाईपलाईन लीकेजच्या घटनांत वाढ
ठाण्यात पाईपलाईन लीकेजच्या घटनांत वाढ

ठाण्यात पाईपलाईन लीकेजच्या घटनांत वाढ

sakal_logo
By

ठाणे, ता. १८ (वार्ताहर) : ठाण्यात पाईपलाईन फुटण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. बुधवारी (ता. १८) सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास ठाण्याच्या धर्मवीर मार्ग पाचपाखाडी येथे पाईपलाईन फुटण्याची घटना घडली. पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. ठाण्यात पाचपाखाडी धर्मवीर मार्ग येथे महानगर गॅस कंपनीच्या पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू होते. दरम्यान, खोदकाम करताना पालिकेची पाईपलाईनही फुटली.
ठाण्यात १८ दिवसांमध्ये तब्बल १० पाण्याच्या पाईपलाईन फुटीच्या घटना घडल्या आहेत. यापूर्वी नव्या वर्षाच्या प्रारंभापासून कोपरी नितीन कंपनी, घोडबंदर रोड, विटावा, गडकरी रंगायतन, कचराळी तलाव, कळवा नाका परिसरात तब्बल ९ घटना घडल्याचे समोर आले आहे. यामध्ये काही ठिकाणी पाईपलाईन लिकेज आहे; तर काही ठिकाणी जलवाहिनीच्या वॉल्व्ह नादुरुस्त झाला आहे. काही ठिकाणी जेसीबीने खोदकाम करताना झालेल्या आघाताने पाईपलाईन लिकेज झाल्याचे उघडकीस आले आहे.