पादचारी पुलाचे काम अंतिम टप्प्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पादचारी पुलाचे काम अंतिम टप्प्यात
पादचारी पुलाचे काम अंतिम टप्प्यात

पादचारी पुलाचे काम अंतिम टप्प्यात

sakal_logo
By

अंबरनाथ, ता. १८ (बातमीदार) : वांगणी रेल्वेस्थानकावरील कर्जत दिशेकडील पादचारी पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच पूल प्रवाशांसाठी खुला होईल; मात्र तीन वर्षांपूर्वी मंजुरी मिळालेल्या रेल्वे उड्डाण पुलाचे काम कधी सुरू होणार, असा सवाल प्रवासी संघटनेतर्फे विचारण्यात आला आहे.
प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता नऊ डब्यांच्या लोकल बारा डब्यांच्या करणार असाल तर प्रत्येक उपनगरीय रेल्वेस्थानकावर किमान दोन पादचारी पूल बांधावेत, अशी मागणी केल्याची माहिती रेल्वे उपनगरी सल्लागार समितीचे संस्थापक-अध्यक्ष माजी सदस्य मनोहर शेलार यांनी दिली. तत्कालीन रेल्वे बोर्ड चेअरमन विवेक सहाय यांच्याकडून पादचारी पुलाला २०११ मध्ये मंजुरी घेतली होती. सर्व रेल्वेस्थानकांवर नवे पादचारी पूल झाले; मात्र वांगणी पूल रखडला होता. या पुलाची पुन्हा निविदा प्रक्रिया करून पादचारी पूल मुंबई रेल्वे विकास महामंडळातर्फे बांधण्यात येत आहे. या पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या पुलामुळे वांगणी अपघातमुक्त रेल्वेस्थानक होणार आहे. कामातील दिरंगाईमुळे या पुलाच्या खर्चाचा भार वाढला असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिल्याचे शेलार यांनी सांगितले.
या पुलासाठी वांगणी रेल्वे प्रवासी संघटना व उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघाने पाठपुरावा केला होता. प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे. वांगणी रेल्वे पूल आणि कल्याण दिशेकडे पुलाला जोडलेल्या लिफ्ट लवकरच सुरू कराव्यात, या मागणीकडे शेलार यांनी रेल्वेचे लक्ष वेधले.

---------------------
वांगणी रेल्वेस्थानकाजवळ २०२० मध्ये रेल्वे उड्डाण पूल मंजूर झाले आहे. या पुलाच्या कामाची लवकर पूर्तता व्हावी, अशी मागणी वांगणी रेल्वे प्रवासी संघटना, प्रवासी महासंघ आणि वांगणी ग्रामपंचायत यांनी रेल्वे प्रशासन आणि केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडे केली आहे.
- मनोहर शेलार, प्रवासी संघटना, माजी अध्यक्ष, वांगणी