भास्कर पाटील कोणत्या शिवसेनेचे? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भास्कर पाटील कोणत्या शिवसेनेचे?
भास्कर पाटील कोणत्या शिवसेनेचे?

भास्कर पाटील कोणत्या शिवसेनेचे?

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : शिवसेनेचे नेते माजी नगरसेवक भास्कर पाटील यांच्यावर दोन्ही गटांकडून दावा सांगितला जात आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने पत्रकार परिषद घेत भास्कर पाटील हे आमच्यासोबत असल्याचे रविवारी जाहीर केले होते; तर आता शिवसेनेचे (ठाकरे) प्रवक्ते अनिश गाढवे यांनी भास्कर पाटील यांच्यावर दबाव टाकला जात असल्याचा आरोप केला आहे. ज्येष्ठ नगरसेवकाचा आवाज दाबला जात असल्याने ते काहीच बोलत नाहीत असे गाढवे म्हणाले.

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने रविवारी पत्रकार परिषद घेत भास्कर पाटील हे आमच्यासोबत असल्याचा दावा केला होता; तर सोमवारी शिवसेनेने पाटील हे जुलैपासून ते जानेवारीपर्यंत आमच्यासोबतच आहेत असा दावा केला आहे. खासदारांना मान द्यायचा म्हणून त्‍यांना भेटण्यासाठी गेलो असे जरी ते सांगत असले, तरी त्यांच्यात ५ जानेवारी रोजी काय चर्चा झाली, त्याची ऑडिओ क्लिप दाखवायची का, असा सवाल गाढवे यांनी केला आहे; तर खासदार राजन विचारे हे जनतेतून निवडून आले आहेत. त्यांना मिळालेली मते लक्षात घेतली तर ही गोष्टी लक्षात येईल, असे शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आले. विधानसभेची जागा दिली नाही म्हणून भाजपच्या केळकर यांचा प्रचार कोणी केला हे सांगायची गरज नाही, असा टोलाही शिवसेनेने नरेश म्हस्के यांना लगावला.