अर्थसंकल्पावर सूचना मांडण्याची मुंबईकरांना संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अर्थसंकल्पावर सूचना मांडण्याची मुंबईकरांना संधी
अर्थसंकल्पावर सूचना मांडण्याची मुंबईकरांना संधी

अर्थसंकल्पावर सूचना मांडण्याची मुंबईकरांना संधी

sakal_logo
By

मुंबई, ता. १८ ः मुंबई महापालिकेच्या वतीने २०२३-२४ आर्थिक वर्षासाठी तयार करण्यात येत असलेल्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये लोकसहभाग असावा यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने महापालिका क्षेत्रातील रहिवाशांनी आपल्या सूचना bmcbudget.suggestion@mcgm.gov.in ई-मेलवर २८ जानेवारी २०२३ पर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. काही राजकीय पक्षांनी सूचना पाठवण्याची मागणी पालिकेकडे केली होती.

२०२३-२४ वर्षाकरिता महापालिकेच्या उत्पन्न व खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज तयार करण्याचे काम सुरू आहे. ५ फेब्रुवारी २०२३ पूर्वी ते सादर करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने लोकसहभागाच्या दृष्टीने मुंबईकरांना आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने संबंधितांना आपल्या सूचना २८ जानेवारीपर्यंत ई-मेलवर पाठवता येणार आहेत.
प्रमुख लेखापाल (वित्त) यांचे कार्यालय, चौथा मजला, विस्तारित इमारत, मुंबई महापालिका मुख्यालय, महापालिका मार्ग, फोर्ट, मुंबई ४००००१ या पत्त्यावर इच्छुकांना लेखी सूचनाही पाठवता येणार आहेत.