धुक्यामुळे मध्य रेल्वेची रखडपट्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धुक्यामुळे मध्य रेल्वेची रखडपट्टी
धुक्यामुळे मध्य रेल्वेची रखडपट्टी

धुक्यामुळे मध्य रेल्वेची रखडपट्टी

sakal_logo
By

मुंबई, ता. १८ : मागील काही दिवसांपासून मुंबईसह परिसरात थंडीचा जोर चांगलाच वाढला आहे. त्यातच धुक्यामुळे परराज्यांतून मुंबईत येणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांची रखडपट्टी होत आहे. या गाड्यांना जलद मार्गिका उपलब्ध करून दिल्याने बुधवारी (ता. १८) मध्य रेल्वेच्या लोकल सेवांच्या वेळापत्रकाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे जलद लोकल १० ते १५ मिनिटे उशिराने धावत असल्याने प्रवाशांचे हाल झाले.
गेल्या काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले असून दाट धुक्यामुळे रेल्वे वाहतुकीला सतत फटका बसत आहे. बुधवारीसुद्धा दक्षिण आणि उत्तर भारतातील राज्यातून मुंबईत येणाऱ्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम पडला आहे. अनेक मेल-एक्स्प्रेस गाड्या धुक्यामुळे आपल्या निर्धारित वेळेपेक्षा १५ ते २० मिनिटे विलंबाने धावत होत्या. या गाड्या उपनगरीय लोकल मार्गावर वळविण्यात आल्याने अप जलद मार्गावरील लोकलचे वेळापत्रक विस्कळित झाले. परिणामी सकाळी १० ते १५ मिनिटे लोकल उशिराने धावत असल्याने सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.