श्‍याम मानव यांच्या सभेत युवकांची धुडगूस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्‍याम मानव यांच्या सभेत युवकांची धुडगूस
श्‍याम मानव यांच्या सभेत युवकांची धुडगूस

श्‍याम मानव यांच्या सभेत युवकांची धुडगूस

sakal_logo
By

नागपूर, ता. १८ ः अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने प्रा. श्‍याम मानव यांच्याद्वारे बागेश्‍वर ऊर्फ धीरेंद्र महाराज यांच्या भंडाफोड कार्यक्रमात आठ ते नऊ युवकांनी धुडगूस घालण्याचा प्रयत्न करीत ‘जय श्रीराम’ अशा घोषणा दिल्या. ही घटना रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. त्यामुळे सभागृहात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या वेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत पोलिस ठाण्यात नेले.
कविवर्य सुरेश भट सभागृहात श्‍याम मानव यांनी बागेश्वर ऊर्फ धीरेंद्र महाराज यांच्या भंडाफोड कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यापूर्वीच त्यांनी बागेश्‍वर महाराज यांना खुले चॅलेंज दिले होते; मात्र त्यापूर्वीच महाराजांनी शहरातून आपला मुक्काम हलवला होता. त्यामुळे त्यांनी महाराजांची पोलखोल करण्यासाठी आज सायंकाळी कार्यक्रम घेतला होता. दरम्यान, कार्यक्रम संपताच आठ ते नऊ युवकांनी आम्हाला प्रश्‍न विचारायचे असल्याची बतावणी केली; मात्र कार्यक्रम संपल्याने प्रश्‍न विचारता येणार नसल्याचे आयोजकांनी सांगितले. त्यानंतर युवकांनी आमच्या हिंदू धर्माला काहीही बोलता असे म्हणून त्यांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत धुडगूस घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे उपस्थित पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. तसेच त्यांना पोलिस ठाण्यात नेण्यात आले; मात्र अचानक झालेल्या या प्रकाराने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.