फ्लॅटच्या प्रलोभनाने वृद्धाची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फ्लॅटच्या प्रलोभनाने वृद्धाची फसवणूक
फ्लॅटच्या प्रलोभनाने वृद्धाची फसवणूक

फ्लॅटच्या प्रलोभनाने वृद्धाची फसवणूक

sakal_logo
By

अंधेरी, ता. १९ (बातमीदार) ः दहिसर येथे स्वस्तात फ्लॅट देण्याचे प्रलोभन दाखवून एका वयोवृद्धाची सुमारे ३२ लाखांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी दोन विकसकांविरुद्ध कुरार पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरू असून लवकरच या दोघांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. तक्रारदार ६७ वर्षांचे असून ते मालाडच्या कुरार परिसरात राहतात. त्यांचा भाऊ वकील असून तो दंत यांच्या साक्षी डेव्हलपर्स कंपनीत कायदेशीर सल्लागार म्हणून काम करत होता. या कंपनीने दहिसर येथे साक्षी इनक्लेव्ह नावाच्या एका इमारतीचे बांधकाम सुरू होते. याच प्रोजेक्टमध्ये स्वस्तात फ्लॅट देण्याचे प्रलोभन दाखवून त्यांना दोन विकसकांनी फ्लॅट घेण्यास प्रवृत्त केले होते. त्यांचा भाऊ कंपनीत कायदेशीर सल्लागार म्हणून काम करीत असल्याने त्यांनीही फ्लॅट घेण्याची तयारी दर्शविली होती. त्यानंतर त्यांनी ३२ लाखांमध्ये ६०० चौ. फुटाचा एक फ्लॅट बूक केला होता. यावेळी त्यांना दुसर्‍या मजल्यावरील एक फ्लॅट अलोट झाल्याचे कागदपत्रे देण्यात आले होते. त्यांच्यात तसा करार झाला होता. त्यात दिलेल्या मुदतीत फ्लॅटचा ताबा दिला नाहीतर त्यांना अठरा टक्के व्याजदाराने प्रत्येक महिन्याला व्याजाचे पैसे दिले जाईल, असे नमूद केले होते. कोरोना काळात इमारतीच्या बांधकामाला विलंब झाला होता. त्यामुळे दिलेल्या मुदतीत त्यांना फ्लॅटचा ताबा मिळाला नाही. याच दरम्यान विकसकांनी त्यांच्‍या फ्लॅटची अन्य एका व्यक्तीला विक्री केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी त्यांना जाब विचारला. या वेळी त्यांनी फ्लॅटसाठी दिलेले पैसे व्याजासहीत देण्याचे मान्य केले होते, मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी पैसे परत केले नाही. त्यामुळे किशोर मिश्रा यांनी या दोघांविरुद्ध कुरार पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे.