Sun, Feb 5, 2023

भिवंडीत कोविड लसीकरणाला सुरुवात
भिवंडीत कोविड लसीकरणाला सुरुवात
Published on : 19 January 2023, 10:54 am
भिवंडी, ता. १९ (बातमीदार) : भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेकरिता शासन स्तरावरून कोविड लसीकरणाकरिता अल्प प्रमाणात कोविशिल्ड लसीचा साठा उपलब्ध झाला आहे. यासाठी भिवंडीतील मीनाताई ठाकरे हॉल, इदगाह नागरी आरोग्य केंद्र सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत सुरू राहणार आहे. ज्या नागरिकांना कोविड लस घ्यायची असेल, त्यांनी दररोज (सुट्टीचे दिवस वगळता) मीनाताई ठाकरे हॉल कोविड लसीकरण केंद्र येथे जाऊन कोविशिल्ड या कोविड लसीचा पहिला, दुसरा व बुस्टर डोस घ्यावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. शहरातील नागरिकांनी या सेवेचा लाभ घेऊन कोरोनापासून स्वतःचे संरक्षण करुन घ्यावे, असे आवाहन वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. बुशरा सय्यद यांनी केले आहे.