Mon, Feb 6, 2023

मुरबाड तहसील कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न
मुरबाड तहसील कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न
Published on : 19 January 2023, 2:47 am
मुरबाड, ता. १९ (बातमीदार) ः माहिती अधिकारात मागितलेली माहिती मिळत नसल्याने मुरबाड तहसीलदार कार्यालयात एका व्यक्तीने अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. तालुक्यातील उचले गावचे रहिवासी राकेश भुंडेरे यांनी तहसीलदार कार्यालयात माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागितलेली माहिती मिळत नव्हती. याला कंटाळून त्यांनी हे कृत्य केल्याचे समजते. हा प्रकार कळताच तेथील उपस्थितांनी भुंडेरे यांच्याकडे वेळीच धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला. या प्रकाराबाबत तहसीलदार संदीप आवारी व मुरबाड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.