अमली पदार्थ विक्री प्रकरणी नायरेजियनसह एकाला अटक. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अमली पदार्थ विक्री प्रकरणी नायरेजियनसह एकाला अटक.
अमली पदार्थ विक्री प्रकरणी नायरेजियनसह एकाला अटक.

अमली पदार्थ विक्री प्रकरणी नायरेजियनसह एकाला अटक.

sakal_logo
By

अमली पदार्थ विक्रीप्रकरणी
नायजेरियनसह एकाला अटक
मानखुर्द, ता. १९ (बातमीदार) ः गोवंडीच्या शिवाजी नगर पोलिसांनी गुरुवारी (ता. १९) अमली पदार्थ विक्रीप्रकरणी नालासोपाऱ्याहून एका नायजेरियन तरुणाला अटक केली. हेनेरी ऊर्फ गोडविल ओकोरो (वय ३८) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी बैंगनवाडी परिसरातूनही अहमद अली ऊर्फ रेती शाहा (वय ३४) याला ताब्यात घेतले असून दोघांकडून सुमारे सव्वापाच लाख रुपये किमतीचा १०५ ग्रॅम एमडीचा साठा जप्त केला आहे.
मागील आठवड्यात शिवाजी नगर परिसरातून अत्तार ऊर्फ राजा चिकना अन्सारी (वय २७) याला एमडीच्या साठ्यासह अटक करण्यात आली होती. चौकशीदरम्यान त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे दोघांना अटक करण्यात आली. शिवाजी नगर पोलिस ठाण्यातील सहायक निरीक्षक नवनाथ काळे यांचे पथक मागील आठवड्यात परिसरात गस्त घालत असताना अत्तार संशयास्पदरीत्या फिरताना त्यांना दिसला होता. तो पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पथकाने त्याला पकडले. चौकशीत त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. पंचांसमक्ष त्याची झडती घेतली तेव्हा त्याच्याकडे ३० ग्रॅम एमडीचा साठा सापडला होता. त्याने चौकशीदरम्यान अहमद एमडी पुरवत असल्याचे सांगितले. त्यानुसार अत्तारचे कॉल रेकॉर्ड तपासून सापळा रचून अहमदला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने हेनेरीकडून एमडी खरेदी करून विकत असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी हेनेरीला अटक केली.