अभ्युदयचा वार्षिक महोत्सव उद्यापासून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अभ्युदयचा वार्षिक महोत्सव उद्यापासून
अभ्युदयचा वार्षिक महोत्सव उद्यापासून

अभ्युदयचा वार्षिक महोत्सव उद्यापासून

sakal_logo
By

मुंबई, ता. १९ ः आयआयटी मुंबईच्या अभ्युदय समूहातर्फे दरवर्षी आयोजित होणाऱ्या वार्षिक महोत्सवाला उद्यापासून सुरुवात होत आहे. यंदाच्या महोत्सवाची थीम ‘द लोकस ऑफ रेझिलियन्स’ अशी असून हा महोत्सव तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात समाजातील गंभीर समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करेल. त्याशिवाय आतापर्यंत फारशी चर्चा न झालेल्या विषयांवरही या महोत्सवात भाष्य केले जाणार आहे. ‘सकाळ’ या महोत्सवाचा माध्यम प्रायोजक आहे.
अभ्युदयच्या या महोत्सवात स्वयं-संरक्षण, महिला सक्षमीकरण, सोशल मीडियाचा कार्यक्षम वापर, मानवी मैलानिवारण, मानसिक आरोग्य आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञान यांसारख्या विषयावर चर्चा केली जाणार आहे. अनन्या बिला, भारतीय अंध क्रिकेट संघाचा कर्णधार अर्जुन कुमार रेड्डी, बेझवाडा विल्सन आदी मान्यवर विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे. अभ्युदयच्या मागील महोत्सवामध्ये आतापर्यंत देशभरातील १५० हून अधिक महाविद्यालयातील १५ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. पद्मभूषण डी. आर. मेहता, आमिर खान, दिया मिर्झा, मेधा पाटकर, आकृती काकर, जो मडियाथ, अंशू गुप्ता, शैलेश गांधी, प्रवीण दीक्षित, सोनम कपूर, श्रद्धा कपूर यांच्यासह असंख्य व्यक्तिमत्त्वांनी त्यांच्या उपस्थितीने महोत्सवाला शोभा दिली होती. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी
https://abhyudayiitb.org/socialfest या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले.