Sun, Feb 5, 2023

मॅक्सी कॅबला परवाना
देण्यासाठी समिती पुनर्गठित
मॅक्सी कॅबला परवाना देण्यासाठी समिती पुनर्गठित
Published on : 20 January 2023, 1:54 am
मुंबई, ता. २० : राज्य सरकार एसटी महामंडळाला पर्याय म्हणून प्रवासी वाहतुकीसाठी मॅक्सी कॅबला परवाने देण्याच्या विचारात होते. त्यासाठी गृह विभागाने मॅक्सी कॅबला परवाना देण्याच्या धोरणाचा आढावा घेण्यासाठी मागील वर्षी समिती गठीत केली होती. त्यानंतर वेळोवेळी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याने मॅक्सी कॅब धोरणाच्या बैठकींना खीळ बसली होती. त्यामुळे आता नव्याने समितीचे पुनर्गठन करण्याचा निर्णय घेण्यात आला. निवृत्त सनदी अधिकारी रमानाथ झा हे या समितीचे अध्यक्ष असून समितीचे सदस्य सचिव म्हणून परिवहन उपायुक्त, तर सदस्य म्हणून परिवहन आयुक्त, एसटीचे व्यवस्थापकीय संचालक तथा उपाध्यक्ष आणि अपर परिवहन आयुक्तांचा समावेश करण्यात आला आहे.