फेर बोटीतून दुचाकी नेता येणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फेर बोटीतून दुचाकी नेता येणार
फेर बोटीतून दुचाकी नेता येणार

फेर बोटीतून दुचाकी नेता येणार

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : सागरी महामंडळाच्या निर्णयाविरोधात भाऊचा धक्का ते रेवसदरम्यानची फेरी बोट सेवा बंद करण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांची आणि पर्यटकांची गैरसोय होत होती. हे लक्षात घेता परिवहन आणि बंदरे विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैन्युटीया यांनी दुचाकी फेरी बोटीतून घेऊन जाण्यावर असलेली बंदी तात्पुरती उठवली आहे. त्यामुळे फेरी बोट चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अनेक वर्षांपासून प्रवासी फेरी बोटीतून शेकडो नोकरदार आणि पर्यटक आपली दुचाकी घेऊन जात-येत असतात. मात्र काही दिवसांपूर्वी सागरी महामंडळाने अचानक नोकरदार, पर्यटकांना आपली दुचाकी फेरी बोटीतून घेऊन जाण्यास बंदी घातली आहे. परिणामी फेरी बोटचालकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे सागरी महामंडळाने घेतलेल्या निर्णयाविरुद्ध २१ डिसेंबरपासून भाऊचा धक्का ते रेवसदरम्यानची फेरी बोट बंद करण्यात आली होती. त्यामुळे मुंबई ते रेवसदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. प्रवाशांची आणि पर्यटकांची गैरसोय लक्षात घेता परिवहन आणि बंदरे विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैन्युटिया यांनी शुक्रवारी (ता. २०) फेरी बोटमालकांची बैठक बोलावली. या बैठकीत दुचाकी फेरी बोटीतून घेऊन जाण्यावर असलेली बंदी दोन महिन्यांसाठी उठवण्यात आली आहे. दोन महिन्यांमध्ये सर्व बोटींच्या मालकांना बोटीत दुचाकी वाहन कसे ठेवायचे, त्यांची संख्या किती हवी आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काय उपाययोजना केल्या, त्याबाबत आराखडा सादर करण्यास सांगितले आहे.
......
परिवहन आणि बंदरे विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैन्युटिया यांनी आमची अडचण समजून आम्हाला दोन महिन्यांची मुदत दिली आहे. त्यासाठी आम्ही प्रधान सचिवांचे आभार मानतो. प्रवाशांची आणि पर्यटकांची गैरसोय होणार नाही म्हणून आम्ही भाऊचा धक्का ते रेवसदरम्यानची फेरी बोट सेवा पुन्हा सुरू केली आहे.
- शराफत अली हुसैन मुकादम, सचिव, मुंबई जलवाहतूक व औद्योगिक सहकारी संस्था