अनधिकृत इमारतीवरून पडून दोन कामगार जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनधिकृत इमारतीवरून पडून दोन कामगार जखमी
अनधिकृत इमारतीवरून पडून दोन कामगार जखमी

अनधिकृत इमारतीवरून पडून दोन कामगार जखमी

sakal_logo
By

दिवा, ता. २० (बातमीदार) : शहरात अनधिकृतपणे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून पाय घसरून खाली पडल्याने गुरुवारी (ता. १९) दोन कामगार गंभीर जखमी झाले. जितेंद्र रजत (वय ४३) व राम साहू (वय ३९) हे इमारतीच्या तळमजल्याच्या दुकानांना असणाऱ्या छतावर आदळून खाली पडल्याने त्यांचा जीव वाचला, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

दिव्यात अनधिकृत बांधकामे सुरू असून कोणतीही सुरक्षा घेतली जात नाही. तसेच एक मजला चढवतानाही किंवा कोणतेही काम करताना जाळी वापरली जात नाही. यामुळे हे अपघात होऊन कामगार मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडत आहेत. दिवा पूर्वेकडील दिवा आगासन रोड परिसरात एका अनधिकृत इमारतीच्या बांधकामावेळी दोन कामगार इमारतीच्या सातव्या मजल्यावरून खाली पडले. त्यामुळे दिव्यातील अनधिकृत इमारतीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ठाणे महापालिकेतील दिवा परिसर हा अनधिकृत इमारतींचे माहेरघर म्हणून ओळखला जातो. दिव्यातील अनेक प्रभागात राजरोसपणे भूमाफियांनी बेकायदा इमारती उभारण्याचा जणू काही सपाटा लावला आहे. दाटीवाटीने उभारल्या जाणाऱ्या अनधिकृत इमारतींमुळे इमारत उभारणीचे काम करणाऱ्या बांधकाम कामगारांबरोबर नागरिकांच्या जिवावर बेतत आहे.