Sun, Jan 29, 2023

वडाळ्यात बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश
वडाळ्यात बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश
Published on : 20 January 2023, 4:07 am
मुंबई : चांगला परतावा मिळण्याचे प्रलोभन दाखवून फसवणूक करणाऱ्या वडाळ्यातील अनधिकृत कॉल सेंटरवर गुन्हे शाखेने कारवाई करत ११ आरोपींना अटक केली. पोलिसांनी गुप्त बातमीदारामार्फत, वडाळा येथील ‘ट्रेड ग्लोबल मार्केट’ नामक कंपनीमार्फत अमेरिकन नागरिकांना ट्रेडिंगच्या बहाण्याने फसवणूक करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सदर ठिकाणी छापा मारत कारवाई केली. त्या ठिकाणी काही व्यक्ती कोणताही परवाना न घेता अनधिकृत कॉल सेंटर चालवत असल्याचे निदर्शनास आले. तपासाअंती त्यांनी किमान दोन ते तीन हजार ग्राहकांशी संपर्क साधून गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून १५ लॅपटॉपसह अन्य मुद्देमाल जप्त केला.