ठाणे ग्रामीण काँग्रेस महिला अध्यक्षपदी जान्हवी देशमुख यांची नियुक्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाणे ग्रामीण काँग्रेस महिला  अध्यक्षपदी  जान्हवी देशमुख यांची नियुक्ती
ठाणे ग्रामीण काँग्रेस महिला अध्यक्षपदी जान्हवी देशमुख यांची नियुक्ती

ठाणे ग्रामीण काँग्रेस महिला अध्यक्षपदी जान्हवी देशमुख यांची नियुक्ती

sakal_logo
By

खर्डी, ता. २१ (बातमीदार) : ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस महिला आघाडीला अखेर अध्यक्षा मिळाल्या असून, महिला उद्योजक म्हणून प्रसिद्ध असलेल्या शहापूरमधील जान्हवी देशमुख यांची प्रदेश अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांनी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. जान्हवी देशमुख या माजी आमदार पा. शि. देशमुख यांच्या नातसून तर शहापूर तालुका एज्युकेशन सोसायटीचे जयवंत देशमुख यांच्या स्‍नुषा आहेत. त्या महिला उद्योजक म्हणून प्रसिद्ध असून स्वकंपनीच्या माध्यमातून त्यांनी शेकडो शेतकरी व महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. मागील वर्षी त्यांनी शहापूर नगरपंचायत निवडणूक लढवून राजकारणात सक्रिय प्रवेश केला. ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांनी जान्हवी देशमुख यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यानुसार महिला प्रदेश अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांनी जान्हवी देशमुख यांची प्रभारी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. जान्हवी देशमुख यांच्यावर जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून काँग्रेस शहापूर तालुका अध्यक्ष महेश धानके, प्रांतिक सदस्य रवींद्र परटोले, युवक अध्यक्ष अंकुश भोईर, शहर अध्यक्ष संजय तांबोळी, वासिंद महिला अध्यक्षा ज्योती परदेशी, युवा कार्यकर्ते गणेश व्यापारी यांनी जान्हवी देशमुख यांचा शाल, श्रीफळ व तुकाराम गाथा देऊन सन्मान केला.