राज्यस्तरीय भजन भजन स्पर्धाचा निकाल जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यस्तरीय भजन भजन स्पर्धाचा निकाल जाहीर
राज्यस्तरीय भजन भजन स्पर्धाचा निकाल जाहीर

राज्यस्तरीय भजन भजन स्पर्धाचा निकाल जाहीर

sakal_logo
By

ठाणे, ता. २१ (बातमीदार) ः विधान परिषदेचे माजी उपसभापती कै. वसंतराव डावखरे यांच्या स्मरणार्थ समन्वय प्रतिष्ठान आणि भारतीय जनता पार्टीच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने ठाणे शहरात राज्यस्तरीय भजन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. स्पर्धेत पुरुष गटात विरार येथील चिंतामणी प्रासादिक भजनी मंडळाने; तर महिलांच्या गटात डोंबिवली शहरातील आई एकवीरा भजनी मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात दिवसभर रंगलेल्या या स्पर्धेत २० पेक्षा अधिक भजन मंडळांनी उत्कृष्ट भजनांचे सादरीकरण केले. गेल्या सहा वर्षांपासून सुरू असलेल्या या स्पर्धेच्या यशाबद्दल आमदार संजय केळकर यांनी कौतुक केले. या स्पर्धेत पुरुष गटात अलिबाग येथील श्री बाप्पादेव प्रासादिक भजन मंडळाने द्वितीय; तर कळवा येथील श्री गंभीरेश्वर भजनी मंडळाने तृतीय क्रमांक पटकावला. महिलांच्या गटात ठाणे येथील स्वानंद भजनी मंडळाने द्वितीय; तर डोंबिवली येथील ओम नादब्रह संगीत महिला भजनी मंडळाने तृतीय क्रमांक पटकावला.