ग्रामीण भागात न्युड मेकअप वाढतोय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामीण भागात न्युड मेकअप वाढतोय
ग्रामीण भागात न्युड मेकअप वाढतोय

ग्रामीण भागात न्युड मेकअप वाढतोय

sakal_logo
By

प्रमोद जाधव, अलिबाग
सोशल मीडियावरील व्हिडीओ आणि वेगवेगळ्या सेलिब्रिटींमुळे शहरीसह ग्रामीण भागातही सुंदर दिसण्यासाठी मेकअपची क्रेझ वाढली आहे. लग्न समारंभ व अन्य सांस्कृतिक कार्यक्रमात सुंदर दिसावे, असे प्रत्येक महिलेला वाटत असते. त्यानुसार प्रत्येक जणी तयारी करतात. मिस युनिवर्स हरनास संधु व सिनेकलाकार अलिया भट यांनी त्यांच्या लग्नामध्ये मिनीमल व न्युड मेकअप केला होता. या मेकअपचा क्रेझ आता तरुणाईसह सर्वच वयोगटातील महिलांमध्ये वाढू लागला आहे. स्किनला मिळत्या जुळत्या मेकअप प्रकारला अधिक पसंती दिली जात आहे.

-----
पूर्वी लग्न समारंभात करवली, अथवा नोकरी व्यवसायात वरिष्ठ पातळीवर असलेल्या महिलाच मेकअप करण्यावर भर देत होते. परंतु, बदलत्या काळानुसार महिलांच्याही राहणीमानात दिवसेंदिवस बदल होत आहे. आपण गोरे दिसावे, यासाठी महिला यापूर्वी पॅन केक मेकअप करत होते; परंतु फॅशन क्षेत्रात सतत नवनवीन ट्रेंड येऊ लागले आहेत. आजचे तरुण, तरुणी तेवढ्याच आवडीच्या नवनवीन ट्रेंडला पसंती देत सुंदर दिसण्यासाठी प्रयत्न करत आहेत. फॅशन क्षेत्रातील असलेली जागरूकता आजच्या पिढीमध्ये मोठ्या संख्येने दिसून येत आहे. त्यात मेकअपवर तरुणाईचा भर दिवसेंदिवस वाढत आहे. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे मेकअपचे साहित्य वाढत असताना, मेकअप करणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. एखाद्या सिनेकलाकारांनी केलेल्या फॅशनचे चित्र समाजात दिसून येत आहे.
अभिनेत्री आलिया भट हिने तिच्या लग्नामध्ये; तसेच मिस युनिवर्स हरनास संधु यांनीही मिनीमल व न्युड मेकअप केला होता. त्या मेकअपचा फॅड सर्वत्र वाढू लागला आहे. सर्वच वयोगटातील महिला सध्या या मेकअपवर भर देत आहेत. ब्युटी पार्लरमध्येही त्याला अधिक पसंती दर्शवत आहे. मिनीमल व न्युड मेकअप संबंधित व्यक्तीच्या स्किनला मिळते जुळते असतात, त्यामुळेच या मेकअपला मागणी वाढल्याचे मेकअप आर्टिस्ट तथा ब्युटीशिअन भाग्यश्री ठोंबरे यांनी सांगितले.
----------------------
न्युड मेकअप म्हणजे काय?
सर्वप्रथम त्वचेला वॉटर बेस्ड मॉइश्चराइजर लावावा लागतो. यामुळे मेकअप जास्त काळ टिकतो आणि त्वचेच्या संरक्षणासाठी मॉइश्चराइजर लावल्याने त्याचा थेट परिणामही होत नाही. त्यानंतर त्वचेला परफेक्ट मॅच होणारे कन्सिलरने आपल्याला चेहऱ्यावरील डाग, मुरूम लपवता येतात. त्यावर फाऊंडेशन स्पंजने लावून चेहरा आणखी उजळवता येतो. दोन ते तीन शेड डार्क किंवा पिच, लाईट पिंक अशी लिपस्टिक लावली जाते. आयशेडोसुद्धा रंगीत न वापरता नॅचरल रंगाचे वापरले जातात. मग आयलायनर आणि पापण्यांना हलका मस्करा लावला जातो. भुवयांना पेन्सिलने हलका हात मारणे, ज्यामुळे डोळे बोलके दिसतात. मग शेवटी गालावर हलका गुलाबी रंगाचा ब्लश लावतात. नॅचरल असा हा मेकअप दिसायला अत्यंत साधा असतो; पण तितकाच मोहक वाटणारा आहे.

----------------------------
यापूर्वी गोरे दिसण्यासाठी लॅकमी फाऊंडेशनचा वापर केला जात होता. आता ग्रामीण भागातही सेलिब्रेटींचे आकर्षण वाढत आहे. पाच वर्षांपासून महिलांमध्ये मेकअपची क्रेझ वाढली आहे. त्यात मिनीमल मेकअपला अधिक पसंती आहे.
- अस्मिता भोईर, मेकअप आर्टिस्ट