सार्वजनिक मंडळांमध्‍ये लगबग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सार्वजनिक मंडळांमध्‍ये लगबग
सार्वजनिक मंडळांमध्‍ये लगबग

सार्वजनिक मंडळांमध्‍ये लगबग

sakal_logo
By

चैताली वर्तक, ठाणे
माघ महिन्यातील माघी गणेश जयंती उत्सवाला आता काहीच दिवस शिल्लक आहेत. २५ जानेवारीला सर्व जण लाडक्या बाप्पाला घरात तसेच सार्वजनिक मंडळात विराजमान करणार आहेत. ठाण्यात देखील चराई टेंभी नाका, राघोबा शंकर रोड, शिंगनगर एमएसईबी ऑफिस, कळवा अशा अनेक ठिकाणी सार्वजनिक बाप्पाचे आगमन होणार आहे.
स्वराज्य मित्र मंडळ, हिंदवी प्रतिष्ठान, सिंगनगरचा राजा, स्वामी समर्थ मित्र मंडळ अशा अनेक मंडळामध्ये बाप्पाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू आहे. मूर्ती निवडण्यापासून बाप्पाला मंडपामध्ये आणण्याची लगबग सध्या ठाण्यातील गलोगल्‍लीत दिसत आहे. गणरायाच्या सभोवताली आकर्षक सजावट करण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो आणि यासाठी मंडप उभारणे, बाप्पाच्या मूर्ती शेजारी आकर्षक सजावट करणे, रोषणाई अशी अनेक कामे मंडळातील सदस्य एकत्र येऊन करत आहेत. कृत्रिम फुलांची आरास, कापडाचे गणेश मंदिर, घडी करता येणारे बाप्पाचे आकर्षक आसन असे वेगवेगळे सजावटीचे साहित्य बाजारात उपलब्ध आहे.