भिवंडीत दिड कोटीचा चोरीचा माल जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिवंडीत दिड कोटीचा चोरीचा माल जप्त
भिवंडीत दिड कोटीचा चोरीचा माल जप्त

भिवंडीत दिड कोटीचा चोरीचा माल जप्त

sakal_logo
By

भिवंडी, ता. २१ (बातमीदार) : तालुक्यातील गोदामामधून चोरी झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या मालाची उकल करून दीड कोटींचा माल जप्त करत आरोपींना अटक करण्यात नारपोली पोलिसांना यश आले आहे.
चोरट्यांनी तालुक्यात पूर्णा गावातील ओसवाल कंपाऊंडमध्ये असलेल्या राज ट्रेडर्सच्या गाळ्याचे शटर वाकवून गोदामातून ७५ लाखाचे विविध कंपनीचे टीव्ही चोरून नेले होते; तर दुसऱ्या घटनेत चोरांनी माणकोली-वेहळे रोडवर असलेल्या श्री माँ बिल्डिंगमध्ये गाळ्यात ठेवलेले १ कोटी ३८ लाख ५ हजार ६२७ रुपयांचे मेडिकल साहित्य चोरून नेले. या दोन घटनांच्या तक्रारी नारपोली पोलिस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे, सहायक पोलिस आयुक्त किशोर खैरनार आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याच्या तपासासाठी पथक तयार करण्यात आले होते. या तपास पथकाने बातमीदाकडून मिळालेल्या माहितीवरून शहरातील कोंबडपाडा येथील रेहान खान यास अटक करत त्याच्याकडून २५ लाख ६० हजाराचे टीव्ही हस्तगत केले; तर दुसऱ्या गुन्ह्यात सीसीटीव्हीच्या मदतीने चोरीचा माल घेऊन जाणाऱ्या टेम्पोमालक मो. सलीम मो. इद्रिस चौधरी यास अटक केली. त्याने इतर तीनजणांच्या मदतीने चोरी केल्याचे पोलिसांना सांगितले. त्याच्याकडून १ कोटी २५ लाख ६१ हजार ९६८ रुपयांचे मेडिकल साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी अधिक तपास करून फरार आरोपी आणि उरलेला माल जप्त करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.