अल्पवयीन मुलीवर बलात्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अल्पवयीन मुलीवर बलात्कार
अल्पवयीन मुलीवर बलात्कार

अल्पवयीन मुलीवर बलात्कार

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : मुंबई पूर्व उपनगरातील घाटकोपर परिसरात राहणाऱ्या एका मतिमंद अल्पवयीन मुलीवर तीन अल्पवयीन मुलांनी बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी तिन्ही अल्पवयीन मुलांना अटक केली आहे. त्यांना बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे. मुलीवर बलात्कार करून आरोपी मुलांनी समाजमाध्यमावर तिचा व्हिडीओ व्हायरल केल्याचा आरोप आहे.

पीडित मुलगी घाटकोपर परिसरात राहणारी आहे. परिसरातील सार्वजनिक स्वच्छ्तागृहात मुलगी जात असताना तिन्ही आरोपींनी तिला घेरले आणि तिला स्वच्छतागृहात नेले. एका मुलाने तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला; तर दुसऱ्याने त्याचा व्हिडीओ बनवून समाजमाध्यमावर अपलोड केला, असे सांगितले जात आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पीडितेच्या भावाने आणि नातेवाईकांनी बहिणीसोबत झालेल्या गैरवर्तनाची घाटकोपर पोलिसांना माहिती दिली. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपींना अटक केली. आरोपी अल्पवयीन असल्याने तिघांचीही रवानगी डोंगरी येथील बालसुधारगृहात करण्यात आली आहे.