द्राक्षाचा हंगाम लांबणीवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

द्राक्षाचा हंगाम लांबणीवर
द्राक्षाचा हंगाम लांबणीवर

द्राक्षाचा हंगाम लांबणीवर

sakal_logo
By

डोंबिवली, ता. २३ (बातमीदार) : यंदा द्राक्षांचा हंगाम लांबणीवर गेला आहे. ऑक्टोबरमध्ये द्राक्षांची छाटणी करण्यात येते, परंतु पावसामुळे द्राक्षांची छाटणी एक महिना लांबणीवर गेली आहे. त्यामुळे उत्पादनाला विलंब झाला आहे. द्राक्षांचा हंगाम सुरू होण्यास एक महिना लोटणार आहे. बाजारात साधारणतः नोव्हेंबर ते डिसेंबरपासून द्राक्षांची आवक होण्यास सुरुवात होते; मात्र जानेवारी महिना संपत आला असूनही आवक मोठ्या प्रमाणात झालेली नाही. साधारणत: फेब्रुवारीच्या सुरुवातीस आवक मोठ्या प्रमाणात होण्यास सुरुवात होईल, असे विक्रेत्यांनी सांगितले. बाजारात दाखल झालेली द्राक्षे आंबट असून साधारणत: ५० ते १०० रुपये प्रतिकिलो दराने त्‍याची विक्री जात केली आहे.
द्राक्षे ही उन्हाळ्याच्‍या हंगामात मिळतात. नाशिक जिल्ह्यात द्राक्षांचे प्रचंड उत्‍पादन होते. सध्या तासगाव, मिरज हे तालुकेही द्राक्षे उत्पादनात अग्रेसर आहेत. येथील द्राक्षांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी आहे. येथील वातावरण द्राक्षांसाठी व मनुका उत्पादनासाठी अनुकूल आहे. मनुका उत्पादनात भारत पहिल्या क्रमांकावर आहे. द्राक्षे खाण्यासाठी तसेच जाम, जेली, ज्यूस, दारू व मनुका तयार करण्यासाठी वापरतात.