Wed, Feb 8, 2023

अमोल कदम यांची निवड
अमोल कदम यांची निवड
Published on : 22 January 2023, 10:05 am
दिवा, ता. २२ (बातमीदार) : कोयना पुनर्वसन गावातील क्षत्रिय मराठा नागरिकांच्या समाजोपयोगी कारकिर्दीकरिता स्थापन करण्यात आलेला कोयना क्षत्रिय मराठा समाज सेवा संघ मागील कित्येक वर्षापासून कार्य करत आहे. या संस्थेच्या प्रसिद्धीप्रमुखपदी अमोल कदम यांची कार्यकारिणीच्या बैठकीत सर्वानुमते निवड करण्यात आली. अमोल कदम यांचा पत्रकार क्षेत्रात असलेला ठसा आणि त्यांचे सामाजिक कार्य उल्लेखनीय आहे. बैठकीत कोयना क्षत्रिय मराठा सेवा संघाचे अध्यक्ष विजय मोरे, सरचिटणीस सुरेश साळवी, अरुण कदम यांच्या हस्ते कदम यांना नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.