भाषासंवर्धन पंधरवड्यानिमित्त व्याख्यान उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाषासंवर्धन पंधरवड्यानिमित्त व्याख्यान उत्साहात
भाषासंवर्धन पंधरवड्यानिमित्त व्याख्यान उत्साहात

भाषासंवर्धन पंधरवड्यानिमित्त व्याख्यान उत्साहात

sakal_logo
By

विरार, ता. २२ (बातमीदार) : वसई येथील विद्यावर्धिनी संचालित अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे भाषासंवर्धन पंधरवड्यानिमित्त विविध स्पर्धा आणि उपक्रम सुरू आहेत. राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागांतर्गत भाषा संचालनालयाच्या सहकार्याने वर्तक महाविद्यालयात पालघर जिल्ह्यातील साहित्यिकांच्या योगदानाचा आढावा घेणारे व्याख्यान झाले. सुप्रसिद्ध कथालेखक प्रा. विवेक कुडू यांनी अत्यंत ओघवत्या शैलीत या विषयाची मांडणी केली. त्यांनी पालघर जिल्ह्यातील लोकसाहित्यापासून अलीकडच्या काळातील महाविद्यालयांच्या मराठी विभागांचे साहित्य क्षेत्रातील योगदान असा विस्तृत पट घेऊन विविध साहित्यिकांच्या वाङ्‍मयीन कार्याचा तसेच त्यांच्या साहित्यकृतींचा आढावा उपस्थितांसमोर मांडला. प्राचार्य डॉ. अरविंद उबाळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि भाषा संचालनालयाचे प्रतिनिधी आनंद गांगण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. मराठी वाङ्‍मय मंडळाच्या विद्यार्थिनींनी प्रा. डॉ. सखाराम डाखोरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रमाचे केलेले आयोजन हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असल्याचे मराठी विभाग प्रमुख डॉ. शत्रुघ्न फड यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृणाली घारे हिने केले; तर प्राची शिंदे हिने पाहुण्यांचा परिचय करून दिला. गायत्री घडवले हिने आभार मानले.