भारती विद्यापीठाचा संघ विजयी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भारती विद्यापीठाचा संघ विजयी
भारती विद्यापीठाचा संघ विजयी

भारती विद्यापीठाचा संघ विजयी

sakal_logo
By

विक्रमगड, ता. २२ (बातमीदार) : मुंबई विभागीय १४ वर्षे वयोगटातील मुलींसाठी खोखो स्पर्धा चिंचणी येथील के. डी. स्कूल या ठिकाणी पार पडल्या. या स्पर्धेमध्ये पालघर, मुंबई महापालिका, मुंबई शहर, पनवेल महापालिका, कल्याण-डोंबिवली महापालिका, ठाणे महापालिका, उल्हासनगर महापालिका, मिरा-भाईंदर महापालिका, उपनगर इत्यादी संघांनी भाग घेतला. १४ वर्षे मुलींमध्ये भारती विद्यापीठ पालघर संघ तसेच मुंबई शहर अंतिम सामन्यात चुरस रंगली. भारती विद्यापीठ पालघर संघाने ६.३० मिनिटांत मुंबई शहर संघाचा पराभव करून विजय मिळवला. या संपूर्ण सामन्यात पूनम तुंबडा, गौरी गवळी, सृष्टी चौधरी, नंदनी राऊत, निशा गावंडा, श्रावणी भोये, कांचन शिसव, सोनम घाटाळ इत्यादी खेळाडूंनी उत्तम कामगिरी बघायला केली. खेळाडूंचे प्रशिक्षक अविनाश भुसारा, क्रीडाशिक्षक वसंत चोपदार यांचे भारती विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूल विक्रमगड शाळेचे मुख्याध्यापक त्यागराजन चिट्टीयार व शिक्षक योगेश कुलकर्णी सहकारी, कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.