कामोठेत मुलांच्या आनंदाला उधाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कामोठेत मुलांच्या आनंदाला उधाण
कामोठेत मुलांच्या आनंदाला उधाण

कामोठेत मुलांच्या आनंदाला उधाण

sakal_logo
By

कामोठे, ता. २२ (बातमीदार) : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने विविध शैक्षणिक उपक्रम राबवणाऱ्या ‘सकाळ’ने आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेला कामोठेतील सुषमा पाटील विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज व सीनिअर नाईट कॉलेज केंद्रावर शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध विषयांवरील चित्र रेखाटताना मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी पालकदेखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठीचे एक व्यासपीठ ‘सकाळ’ ने चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून उपलब्ध केले आहे. या स्पर्धेला जनमानसातून नेहमीच प्रतिसाद मिळाला आहे. यंदा प्रथमच अबालवृद्धांसाठी ऑनलाईन पद्धतीने सहभागाची संधी मिळाली होती. तसेच कामोठेतील सुषमा पाटील विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज आणि सीनिअर नाईट कॉलेज केंद्रावर सकाळी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. या केंद्रावर पहिली ते दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी अ, ब, क, ड गटामध्ये एकूण ३३२ विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे चेअरमन दिलीप पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंदार पनवेलकर, संचालक अर्जुन गोवारी, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक बबन काटकर, प्राथमिकचे मुख्याध्यापक प्रकाश म्हात्रे, इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका मनीषा जाधव, मोहिनी वाघ, चित्रकला शिक्षिका अर्चना बनकर, कांचन मुळुंद, कर्मचारी सुमन माने, संगीता लिंगे यांनी सहकार्य केले.