
कल्याण पूर्वमध्ये ढोल ताशांच्या गजरात स्वागत
कल्याण, ता. २२ (बातमीदार) : ‘सकाळ’ने आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धा कल्याण पूर्वमधील नांदिवली परिसरातील एसडीएलके एज्युकेशन ट्रस्ट संचालित द्वारका विद्यामंदिर माध्यमिक व बाल विकास मंदिर प्राथमिक या विद्यालयात पार पडली. यावेळी स्पर्धकांचे ढोल, ताशा, लेझीम पथकाने स्वागत करण्यात आले. याप्रसंगी संस्थापक दत्तात्रय दळवी, संचालिका मीरा दळवी यांनी स्पर्धेसाठी सहभागी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या, तर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विद्यालयाच्या व्यवस्थापिका सीमा दळवी, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रकाश धानके, ज्येष्ठ शिक्षक आप्पासाहेब जाधव, विशाल राजाणे, शिक्षिका विजया बाम्हणे, स्वप्ना गोसावी, मनीषा कालेलकर, मेघा कांबळे, संगीता परजणे, निकिता घाडगे, आगरी-कोळी समाज, उन्नती शैक्षणिक संस्थेचे चंद्रकांत परदेसी, वाल्मिक पाटील, सुगंधा हरड आदींनी विशेष मेहनत घेतली.
----------------------------------
डोंबिवलीतही उत्स्फूर्त प्रतिसाद
डोंबिवली : चंद्रेश लोढा मेमोरियल स्कूल, लोढा हेवन, निळजे आणि रामभाऊ भिसे शाळा, निळजे या दोन शाळांतील विद्यार्थ्यांनी ‘सकाळ चित्रकला स्पर्धे’ला चांगला प्रतिसाद दिला. चित्रे काढताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. चंद्रेश लोढा मेमोरियल शाळेच्या मुख्याध्यापिका लक्ष्मी नायडू यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रकला शिक्षिका संगीता सूर्यवंशी, अनुराधा अय्यर, स्मिता देशमुख, स्मिता राजीव, कल्पना नायडू, दीपा गुरनानी, ममता कोटियल, क्रितिका नाईक, लिलाक्षी सुरेश आमीन या शिक्षकांनी स्पर्धेसाठी सहकार्य केले. रामभाऊ भिसे शाळेतील मनीषा गायकवाड, जयश्री पोटावडे आणि प्रशांत सपकाळ या शिक्षकांचेही सहकार्य लाभले.