Sun, Jan 29, 2023

करावे गावात स्पर्धेचा उत्साह
करावे गावात स्पर्धेचा उत्साह
Published on : 22 January 2023, 11:21 am
नेरूळ ः नवी मुंबईतील मुलांच्या संकल्पनांना वाव देण्यासाठी ‘सकाळ’ने भरवलेल्या चित्रकला स्पर्धेत विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. ज्ञानदेव सेवा मंडळाची प्राथमिक शाळा करावे गाव, नेरूळ येथे झालेल्या स्पर्धेत विद्यार्थ्यांचा सहभाग उल्लेखनीय होता. कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षकांनी सहकार्य केले. या शाळेचे मुख्याध्यापक बंकट तांडेल, संदीप म्हात्रे, परेश मळवी, अरुणा कडू, ज्योती गावंड यांचे सहकार्य लाभले.