व्यापाऱ्यांसाठी ठाणे सुरक्षित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

व्यापाऱ्यांसाठी ठाणे सुरक्षित
व्यापाऱ्यांसाठी ठाणे सुरक्षित

व्यापाऱ्यांसाठी ठाणे सुरक्षित

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २२ : धर्मवीर आनंद दिघे यांचे जैन समाजावर विशेष प्रेम होते. त्यांनीच शहरातील बाजारपेठ घडवली. ठाणे हे सुरक्षित शहर असल्याने येथे मोठा व्यापारी वर्ग येऊन वसला आहे, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. तसेच जैन समाजाला शाळा उभारण्यासाठी भूखंड देणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

ठाणे शहरातील टेंभी नाका येथील जैन मंदिरात रविवारी (ता. २२) दुपारी आयोजित महोत्सवात जात मुख्यमंत्र्यांनी दर्शन घेतले. या वेळी त्यांचे पगडी आणि मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, ठाण्यात जैन समाज अनेक वर्षे व्यापार व्यवसाय करत आहे. कारण हे शहर त्यांना सुरक्षित वाटते. जैन समाज हा ठाणे शहराच्या विकासात नेहमी पुढे होता. कोरोना काळातही या समाजाने मोठे योगदान दिले होते. आता ठाण्याचाच मुख्यमंत्री असल्याने शहराचा विकास हा आणखीन वेगाने होईल, असा त्यांनी प्रतिपादन केले. ठाणे शहरात जैन समाजाची शाळा उभारण्याची मागणी या वेळी पुढे आली. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्तांशी चर्चा करून आरक्षित भूखंड देण्याबाबत सूचना करू, असे आश्वासन दिले.