रस्ता सुरक्षा अभियानातून जनजागृती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रस्ता सुरक्षा अभियानातून जनजागृती
रस्ता सुरक्षा अभियानातून जनजागृती

रस्ता सुरक्षा अभियानातून जनजागृती

sakal_logo
By

खारघर, ता. २३ (बातमीदार) : रस्ते अपघातात बळी पडणाऱ्यांची संख्या चिंताजनक आहे. त्यामुळे वाहतूक नियमांचे पालन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याची जाणीव करून देण्यासाठी खारघर वाहतूक शाखेच्या वतीने खारघर परिसरातील शाळा-महाविद्यालये, तसेच रस्त्यावर जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे.
भारतात दरवर्षी अपघातात अनेकांचे बळी जातात. त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी दरवर्षी जानेवारी महिन्यात राष्ट्रीय रस्ता सुरक्षितता अभियान राबवले जाते. या वेळी रस्ता अपघातांची कारणे, अपघातांचे प्रकार व अपघातांची ठिकाणे, अपघातांची वेळ, अपघातांची कारणे या विषयावर वाहन चालकांमध्ये जनजागृती करण्यात येते. याच अनुषंगाने सायन-पनवेल महामार्गावर विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्या दुचाकीचालकांना हेल्मेटचे महत्त्व पटवून देण्यासाठी चालकांना हेल्मेटचे वितरण करण्यात आले. या वेळी खारघर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक योगेश गावडे यांनी खारघर परिसरात यमदूताचे देखावे आणि पथनाट्याद्वारे वाहनचालकांना वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती करण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच रिक्षाचालकांना मोटार वाहन कायद्याचे पालन करण्याबाबत प्रबोधन केले गेले.
----------------------------------------
वाहतुकीच्या नियमांबाबत प्रबोधन
खारघर वाहतूक शाखा येथील नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांविषयी जनजागृती करण्यात आली. जड व अवजड वाहनचालकांना वाहतूक नियमांवर प्रबोधन करून रस्त्याच्या डाव्या बाजूस चालण्याबाबत सूचना करण्यात आल्या. त्याचबरोबर फॅन्सी नंबर प्लेट व काळ्या काचा असणाऱ्या वाहनचालकांना वाहतुकीच्या नियमांबाबत प्रबोधन केले. या उपक्रमात वाहतूक शाखेतील सर्व वाहतूक पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते.