Thur, Feb 9, 2023

माथाडी युनियनच्या मुंबई अध्यक्षपदी शिवाजी गजरे
माथाडी युनियनच्या मुंबई अध्यक्षपदी शिवाजी गजरे
Published on : 23 January 2023, 10:51 am
घाटकोपर, ता. २३ (बातमीदार) ः शिवाजी गजरे यांची माथाडी कामगार युनियन ट्रान्सपोर्टच्या मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाजी गजरे यांच्याकडून या पदाला न्याय मिळेल अशी आशा सर्व माथाडी कामगार वर्गात झाली आहे. ही नियुक्ती हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना अनुसरून तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व बाळासाहेबांची शिवसेना उपनेते खासदार राहुल शेवाळे, नगरसेविका कामिनी शेवाळे यांच्या वतीने केली गेली आहे.