शिक्षक सभेचा हळदी-कुंकू समारंभ उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षक सभेचा हळदी-कुंकू समारंभ उत्साहात
शिक्षक सभेचा हळदी-कुंकू समारंभ उत्साहात

शिक्षक सभेचा हळदी-कुंकू समारंभ उत्साहात

sakal_logo
By

मुंबई, ता. २३ (बातमीदार) ः मुंबई महापालिका शिक्षक सभेतर्फे महिला सभासदांसाठी शिक्षक भवन येथे हळदी-कुंकू कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. महापालिकेच्या विविध विभागांतून अनेक महिला पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद या सोहळ्यास उपस्थित होते. सुरुवातीला उपस्थित सर्व महिलांना शिक्षा सभेतर्फे हळदी-कुंकू आणि भेटवस्तू देण्यात आल्या. यानिमित्त सर्व उपस्थितांना शिक्षक सभेचे सरचिटणीस शरद सिंह, अध्यक्ष सर्जेराव चवरे, कोषाध्यक्ष जयप्रकाश सावंत यांनी मार्गदर्शन केले. तसेच महिला शिक्षकांच्या समस्या जाणून घेतल्या. कोरोना काळानंतर प्रथमच सर्व महिला कार्यकर्ते एकत्र आल्यामुळे वेगळा आनंद दिसून येत होता. कार्यक्रम शिक्षक सभेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या आमुदा अन्नाराज यांच्या अध्यक्षतेखाली झाला. कार्यक्रमाची पूर्वतयारी कार्यालयीन चिटणीस प्रकाश राऊत यांनी केली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यसमिती सदस्य सुप्रिया आईर व आभार प्रदर्शन निशा मौर्या यांनी केले.