‘याला जीवन ऐसे नाव’ पुस्तकाचे प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘याला जीवन ऐसे नाव’ पुस्तकाचे प्रकाशन
‘याला जीवन ऐसे नाव’ पुस्तकाचे प्रकाशन

‘याला जीवन ऐसे नाव’ पुस्तकाचे प्रकाशन

sakal_logo
By

डोंबिवली, ता. २३ (बातमीदार) : गेली दोन वर्षे समाजात वावरताना वेगवेगळ्या कारणांनी केलेल्या आत्महत्या, नोकरी मिळत नाही म्हणून वाढत चाललेले नैराश्य हे सगळे ऐकून, वाचून, टीव्हीवर पाहून मन अस्वस्थ होत असायचे आणि मग मनाने उचल खाल्ली, की आपण एक पुस्तक लिहावे. आयुष्यातल्या प्रसंगांना कसे तोंड द्यावे, याचे उपदेश न करता गोष्टीरूपाने मार्गदर्शन करावे. मग अनेकांच्या सहकार्याने या पुस्तकाचा जन्म झाला. शून्यातून स्वतःच्या यशाचे एक विश्व निर्माण केले. या सर्व अनुभवांचे कथन म्हणजे हे पुस्तक, असे प्रतिपादन लेखक माधव जोशी यांनी केले. ‘याला जीवन ऐसे नाव’ हे पुस्तक माधव हरी जोशी लिखित असून या पुस्तकाचे प्रकाशन शारदा प्रकाशन यांनी केले आहे. पुस्तक प्रकाशन सोहळा समारंभाच्या प्रमुख पाहुण्या माधवी घारपुरे, शारदा प्रकाशनाचे प्रा. संतोष राणे, प्रफुल्ल फडके, पुरुषोत्तम वारे, विश्वास वाळिंबे, राजीव देशपांडे, नितीन पंडित, सुनील चव्हाण, स्वाती गोखले आदी मान्यवर उपस्थित होते.