Sun, Jan 29, 2023

४.६० लाख रोकड आणि १.३० कोटीच्या हिरोईनसह २६ वर्षीय तरुण अटकेत
४.६० लाख रोकड आणि १.३० कोटीच्या हिरोईनसह २६ वर्षीय तरुण अटकेत
Published on : 23 January 2023, 12:04 pm
सांताक्रूझमध्ये तरुणाकडून
सव्वा कोटीचे हेरॉईन जप्त
अंधेरी, ता. २३ (बातमीदार) ः मुंबई शहर आणि उपनगरामध्ये अमली पदार्थाची तस्करी व खरेदी-विक्री करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध अमली पदार्थ विरोधी कक्षाद्वारे कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याअंतर्गत पथकाने एका २६ वर्षीय तरुणाला सांताक्रूझ पूर्व परिसरातून ताब्यात घेत त्याच्याकडून ४ लाख ६० हजार रोख आणि १ कोटी ३० लाखांचे हेरॉईन जप्त केले.
कांदिवलीतील अमली पदार्थ विरोधी कक्षातील प्रभारी पोलिस निरीक्षक रूपेश नाईक व पथक सांताक्रूझ पूर्व परिसरात गस्त घालत असताना त्यांना वाकोला पुलाच्या खाली एक तरुण हातात काळ्या रंगाची प्लास्टिक कॅरीबॅग घेऊन संशयास्पदरीत्या उभा असलेला आढळून आला. त्याच्याकडे २७५ ग्रॅम हेरॉईन पोलिसांना सापडले.