Thur, Feb 2, 2023

अनैतिक संबंधात बाधा येत असल्याने पतीचा खून
अनैतिक संबंधात बाधा येत असल्याने पतीचा खून
Published on : 23 January 2023, 12:33 pm
वाडा, ता. २३ (बातमीदार) : तालुक्यातील बांधणपाडा येथील तरुणाचा शुक्रवारी (ता. २०) रात्री संशयास्पद मृत्यू झाला होता. या मृत्यूचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले असून त्याच्या पत्नीनेच चार सहकाऱ्यांच्या मदतीने खून केल्याचे उघडकीस आले. बांधणपाडा येथे संतोष टोकरे हा पत्नी व दोन मुलींसह राहत होता. दिनकर पाडा येथील एका कंपनीत तो कामाला होता. त्याच्या पत्नीचे (वय ३२) एका तरुणाशी अनैतिक संबंध होते. त्यांच्यामध्ये संतोष हा अडसर ठरत असल्याने पत्नीने चार सहकाऱ्यांच्या मदतीने राहत्या घरी शुक्रवारी रात्री लोखंडी वस्तूने डोक्यावर प्रहार करून त्याचा खून केला. याप्रकरणी रविवारी (ता. २२) रात्री पांढरीपाडा येथील चार जणांसह तरुणाची पत्नी अशा एकूण पाच जणांना अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.