‘श्यामची आई’ चिनी भाषेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘श्यामची आई’ चिनी भाषेत
‘श्यामची आई’ चिनी भाषेत

‘श्यामची आई’ चिनी भाषेत

sakal_logo
By

मुंबई, ता. २३ : भारतीय तरुणाईच्या मनात आईविषयी प्रेम, वात्सल्य, भक्ती निर्माण करणारे ‘श्यामची आई’ हे पुस्तक चिनी भाषेत अनुवादित करण्यात आले आहे. रसिका पावसकर यांनी हा चिनी अनुवाद केला आहे.
‘अनाम प्रेम’तर्फे रविवारी (ता. २९) या अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन होईल. रसिका पावसकर या चीनच्या हनान विभागातील ‘चंगचौ’ विद्यापीठात चिनी भाषा शिकवण्याचे पदवी शिक्षण घेत आहेत. एका आईचे, पूज्य साने गुरुजींचे व समाजाचे ऋण म्हणून रसिका पावसकर यांच्याकडून हा अनुवाद करण्यात आला आहे. ‘श्यामची आई’ ही कादंबरी पूज्य साने गुरुजी यांनी १९३३ मध्ये लिहिली असून मातेबद्दल असणारे प्रेम, भक्ती व कृतज्ञता वगैरे अपार भावना यात मांडलेल्या आहेत. आईला देवता मानणारी भारतीय संस्कृती आता परदेशातही पोहोचावी, असा रसिका पावसकर यांचा मानस आहे. ‘श्यामची आई’चा विविध भारतीय व परदेशी भाषांमध्ये अनुवाद झाला आहे; परंतु चिनी भाषेत आतापर्यंत अनुवाद झाला नव्हता. त्यामुळे हा अनुवाद करण्यात आला. चिनी भाषेतील ‘श्यामची आई’चे प्रकाशन प्रभादेवीच्या रवींद्र नाट्यमंदिरातील पु. ल. देशपांडे कला अकादमी, मिनी थिएटर, तिसरा मजला येथे रविवारी (ता. २९) सकाळी १० वाजता होईल.