महापालिका घेणार स्वच्छता स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिका घेणार स्वच्छता स्पर्धा
महापालिका घेणार स्वच्छता स्पर्धा

महापालिका घेणार स्वच्छता स्पर्धा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २३ : केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयातर्फे होणाऱ्‍या स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये मुंबई महापालिका भाग घेत आहे. महापालिका क्षेत्रात विविध गटांमध्ये स्वच्छता स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. याअंतर्गत महापालिका २४ विभागांमधील हॉटेल्स, शाळा, रुग्णालये (आरोग्य सेवा सुविधा), निवासी संकुल, शासकीय कार्यालये आणि बाजार संघटना यांमध्ये स्वच्छता स्पर्धा राबवणार आहे.
मुंबईतील नागरिकांकडून ‘स्वच्छ भारत मिशन’ या विषयावरील जिंगल, चित्रफीत, पोस्टर किंवा रेखांकन, भित्तीचित्र, पथनाट्ये आयोजित करण्यात येणार आहेत. ‘स्वच्छ टेक्नॉलॉजी चॅलेंज’ अंतर्गत व्यक्ती, स्टार्ट-अप, कंपन्या, शैक्षणिक संस्थांकडून सामाजिक समावेश, शून्य कचरा, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, पारदर्शकता (डिजिटल सक्षमीकरण) यांसारख्या क्षेत्रात स्वच्छ भारत मिशनला चालना मिळेल. या प्रकारच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांबाबत प्रवेशिका आमंत्रित करण्यात येत आहेत. या स्पर्धेत सहभाग नोंदवण्याची अखेरची तारीख २९ जानेवारी असल्याची माहिती घन कचरा व्यवस्थापन खात्याच्या उपयुक्त चंदा जाधव यांनी दिली आहे. स्पर्धेच्या प्रत्येक गटातील विजेत्यांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन मुंबई महापालिकेतर्फे गौरवण्यात येणार आहे. या स्पर्धेअंतर्गत एकूण आठ प्रमुख गट आहेत.
...
घनकचरा व्यवस्थापन खात्याचे प्रमुख अभियंता भारत तोरणे यांनी सांगितले की, सदर स्वच्छता स्पर्धेत सहभाग घेण्यास इच्छुक व्यक्ती / गट यांनी https://www.unitedwaymumbai.org/bmcswachhsurvekshan२३ या लिंकचा वापर करून अर्ज व माहिती भरावयाची आहे. स्पर्धा घेण्यासाठी ‘युनायटेड वे मुंबई’ या संस्थेची नियुक्ती केली आहे.
...