यंदा ठाण्यात माघी गणेशोत्सवाचा जल्लोष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यंदा ठाण्यात माघी गणेशोत्सवाचा जल्लोष
यंदा ठाण्यात माघी गणेशोत्सवाचा जल्लोष

यंदा ठाण्यात माघी गणेशोत्सवाचा जल्लोष

sakal_logo
By

ठाणे, ता. २४ (वार्ताहर) : ठाण्यात यंदा माघी गणेशोत्सव मोठ्या धामधुमीत साजरा होणार आहे. शहरातील सार्वजनिक मंडळे आणि घरगुती मंडळे यंदा बाप्‍पाचा जन्‍मोत्‍सव साजरा करण्‍यासाठी सज्‍ज झाली आहेत. भाद्रपद महिन्यात होणाऱ्या गणेशोत्सवाप्रमाणे यंदा माघी गणेशोत्सवाचा जल्लोष जिल्‍ह्यात सर्वत्र पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी विविध विभागांत मंडप सजलेले असून, विद्युत रोषणाईही करण्‍यात आलेली आहे. मागील वर्षीपेक्षा यंदा माघी उत्सवात घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सवाच्या संख्येत मोठी वाढ झालेली आहे.
कोरोना महामारीनंतर यंदा प्रथमच भाद्रपद महिन्यात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. तसाच जल्लोष यंदा ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध परिमंडळात पाहायला मिळत आहे. यंदा माघी गणेशोत्सवासाठी मूर्तींची मागणी वाढली असल्याचे मूर्ती विक्रेत्यांनी सांगितले. २५ जानेवारी रोजी माघी गणेशाची प्रतिष्ठापना होणार आहे. दीड दिवसाच्या माघी गणेशमूर्तीचे विसर्जन २६ जानेवारी; तर सात दिवसांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन ३१ जानेवारी रोजी होणार आहे. ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत यंदा माघी गणेशोत्सवात विविध परिमंडळात दीड, पाच, सात आणि दहा दिवसांचे बाप्‍पा विराजमान होणार आहेत.
माघ महिन्यात विनायक, वरद, तीळकुंद चतुर्थीचा शुभयोग असून, पूर्वापार गणेश मंदिरात हा उत्‍सव थाटामाटात साजरा केला जातो. अनेक गणेशभक्तांच्या आग्रहाखातर सार्वजनिक व घरगुती अशा दोन्ही स्वरूपात माघी गणेशोत्सवाचे भव्‍ दिव्‍य स्वरूप काही वर्षांपासून दिसू लागले आहे.
-------------------------------------------
...अशी आहे पौराणिक कथा
गणपतीच्या तीन अवतारांच्या कथा लोकप्रिय आहेत. यापैकी एक कथा आहे माघी गणेश जयंतीची. याच दिवशी धुंडीराज व्रत करण्यास सांगितले जाते. स्कंद पुराणातील कथेनुसार नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या घरी गणपतीने विनायकाचा अवतार घेतला. ही घटना माघ शुद्ध चतुर्थी या दिवशी घडली. याच कारणामुळे हा दिवस विनायकी अथवा विनायक चतुर्थी म्हणूनही साजरा केला जातो. माघी गणेश जयंतीला तीळकुंद चतुर्थी, वरद चतुर्थी असेही म्हणतात. या दिवशी गणपतीचा जन्म झाला. पृथ्वीवर या दिवशी सर्वाधिक गणेशलहरी सक्रिय असतात. या दिवशी षोडशोपचारे गणेशपूजन करून तीळमिश्रित गुळाच्या लाडवाचा नैवेद्य अर्पण केला जातो.
-------------------------------------------------------------------------

परिमंडळनिहाय आकडेवारी :
================================================
परिमंडळ दीड पाच सहा सात दहा एकूण
================================================
परिमंडळ-१ ०५ ०४ निरंक ०६ निरंक १५
परिमंडळ-२ ०३ ०३ निरंक निरंक निरंक ०६
परिमंडळ-३ ०८ ३३ ०२ ०५ ०१ ४९
परिमंडळ-४ ०६ १८ ०१ ०४ ०३ ३२
परिमंडळ-५ ११ ०८ - ०४ ०३ १६
===================================================
====================================================

२०२३ माघी गणेशमूर्ती प्रतिष्ठापना
===================================================
परिमंडळ सार्वजनिक खासगी
===================================================
परिमंडळ-१ ----------------------------१५----------------------------३०६
परिमंडळ-२-----------------------------०७--------------------------- ४१५
परिमंडळ-३-----------------------------४९----------------------------३५८
परिमंडळ-४-----------------------------३२----------------------------२५३
परिमंडळ-५-----------------------------२६----------------------------१४०
=================================================
१२९------------------------१,४७२
=================================================
डोंबिवलीतील गणेश मंदिर सजले
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २४ : डोंबिवलीतील श्री गणेश मंदिर संस्थानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही माघी गणेश जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. २५ ते २९ जानेवारी असा पाच दिवस हा उत्सव होणार असून यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. सोहळ्याच्या पहिल्या दिवशी २५ जानेवारीला पहाटे ५ वाजता श्री गणेशाची महापूजा, सकाळी ६ वाजता गणेशयाग होणार असून त्यानंतर सामूहिक अथर्वशीर्ष आवर्तने, हभप गंगाधरबुवा व्यास यांचे गणेश जन्माचे कीर्तन त्यानंतर सायंकाळी ६ वाजता प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला अमृत महोत्सवानिमित्त ‘विजयी भव’ हा नृत्यांजली आविष्कार सादर केला जाणार आहे. २६ जानेवारीला सकाळी ८ वाजता सामुदायिक श्री सत्यविनायक महापूजा, सायंकाळी ६ वाजता कीर्तन कार्यक्रम, २७ व २८ जानेवारीला कीर्तन सोहळा व २९ जानेवारीला दुपारी ३ वाजता प्रक्षाळ पूजा होणार आहे. तसेच २७ व २८ जानेवारीला रात्री ८.३० वाजता कोकणातील पारंपरिक पद्धतीने आरत्या व भोवत्या सादर केल्या जाणार आहेत.