राजेश निमसे यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजेश निमसे यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिर
राजेश निमसे यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिर

राजेश निमसे यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिर

sakal_logo
By

किन्हवली, ता. २४ (बातमीदार) : आमदार किसन कथोरे यांचे कट्टर समर्थक व किन्हवली परिसरातील वेहळोली (खु.) गावचे सुपुत्र राजेश निमसे यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. लोकनेते किसन कथोरे मित्र मंडळ सोगाव, किन्हवली विभाग व जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या विद्यमाने वेहळोली, सोगाव आणि चेरवली ग्रामस्थांच्या सहकार्याने २६ जानेवारी रोजी सकाळी ११ ते ४ यादरम्यान महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या वेळी तज्‍ज्ञ डॉक्टरांमार्फत मोतिबिंदू, हर्निया, हायड्रोसील, मूळव्याध, अपेंडिक्स आदी व्याधींवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. नेत्ररोग, रक्तदाब, मधुमेह तपासणी करून मोफत चष्मेवाटप करण्यात येणार आहे. या शिबिरात आमदार किसन कथोरे, जिजाऊचे संस्थापक अध्यक्ष नीलेश सांबरे आदींसह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, साहित्य व पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.