पालकांसमोर विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालकांसमोर विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक
पालकांसमोर विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक

पालकांसमोर विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक

sakal_logo
By

ठाणे, ता. २४ (बातमीदार) : दिवा पूर्वमधील एस. एम. जी. विद्यामंदिरमध्ये प्राथमिक विभागाचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धांमध्ये संपादन केलेल्या यशाचं कौतुक पालकांच्या उपस्थितीमध्ये व्हावे या हेतूने ओम साई शिक्षण संस्थेच्या संकल्पनेतून वार्षिक क्रीडा स्पर्धांच्या पारितोषिक वितरण समारंभाचे भव्य स्वरूपात आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याची सुरुवात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मारुती गायकर यांच्या हस्ते क्रीडा ध्वज फडकवून आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आली. या पारितोषिक वितरण समारंभासाठी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक अनंत धाडवे, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सानिका सरपोले, एस. एम. जी. ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य मुकेश पांडे यांच्यासह बहुसंख्येने पालक उपस्थित होते. या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.