
आसनगाव येथे ठाकरे गटाचा कार्यकर्ता मेळावा उत्साहात
खर्डी, ता. २४ (बातमीदार) : आसनगाव जिल्हा परिषद गटामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा मेळावा घेण्यात आला. विविध पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या. मेळाव्यात पक्षाचे संपर्कप्रमुख रूपेश म्हात्रे, जिल्हाप्रमुख विश्वास थळे यांच्या हस्ते आसनगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचांसहित १६ सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या मेळाव्यात उपजिल्हाप्रमुख शंकर खाडे, काशिनाथ तिवरे, ज्ञानेश्वर तळपाडे, अशोक झोपे यांनी मार्गदर्शन केले; तर उपसरपंच राहुल शिंदे यांनी शाखेच्या वतीने मनोगत व्यक्त केले. या वेळी विधानसभा संपर्कप्रमुखपदी मिलिंद देशमुख, सहसंपर्कप्रमुखपदी सुरेंद्र तेलवणे, विजय देशमुख, शिवाजी देशमुख, वाहतूक सेना संघटकपदी सुधीर गोरले, प्रसिद्धीप्रमुखपदी प्रकाश फर्डे, सोशल मीडिया प्रमुखपदी रवींद्र खाडे, धसई विभाग महिला संघटकपदी दीपाली विशे तसेच शाखा संघटकपदी मनीषा निचिते, सुरेखा मोरे, उपतालुका युवा अधिकारी सचिन वेखंडे, कळंबे गणेशवाडी युवा सेना उपशाखा युवा अधिकापदी रमेश भोईर, विभाग युवा अधिकारीपदी दिनेश फर्डे यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तिपत्र देण्यात आले.
या वेळी जिल्हा युवा सेना अधिकारी अल्पेश भोईर, जिल्हा महिला संघटक रश्मी निमसे, दीपक पाटील, तालुकाप्रमुख कुलदीप धनके, तालुका संघटक चंद्रकांत जाधव, सुभाष विशे, दत्तात्रय ठाकरे, तालुका महिला संघटक गुलाब भेरे, जयवंत तारमळे, उपजिल्हा युवा अधिकारी अविनाश किरपण, तालुका युवा अधिकारी स्वानंद शेलवले, आसनगाव शाखाप्रमुख प्रवीण कदम, यांच्यासह रेश्मा मेमाने, संजय सुरळके, नितीन चंदे, बॉबी चंदे, जयवंत गडगे, पूनम चंदे, प्रतिभा भागवत, इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.