Sun, Jan 29, 2023

सुभाषचंद्र बोस, बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी
सुभाषचंद्र बोस, बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी
Published on : 24 January 2023, 12:32 pm
पालघर, ता. २४ (बातमीदार) : जिल्हा परिषद पालघर येथे नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, समाजकल्याण समिती सभापती मनीषा निमकर, बांधकाम आणि आरोग्य समिती सभापती संदेश ढोणे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी संघरत्ना खिल्लारे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज पांडे, जिल्हा कृषी अधिकारी सूरज जगताप, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पंजाबराव चव्हाण तसचे सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.