जॉगिंग ट्रॅक, रोपवेची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जॉगिंग ट्रॅक, रोपवेची मागणी
जॉगिंग ट्रॅक, रोपवेची मागणी

जॉगिंग ट्रॅक, रोपवेची मागणी

sakal_logo
By

मुलुंड, ता. २४ (बातमीदार) ः संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबईतील सुरक्षित क्षेत्र असून त्याची व्याप्ती ८७ किलोमीटर परिघात आहे. या राष्ट्रीय उद्यानाची पूर्वेकडील सीमा मुलुंड उपनगराला लागून आहे. येथील नागरिकांना निसर्गाच्या सन्निध्यात मोकळ्या हवेत फेरफटका मारता यावा यासाठी येथे जॉगिंग ट्रॅक आणि रोप वे निर्माण करण्याची मागणी आमदार मिहिर कोटेचा यांनी राज्य शासनाकडे केली आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिलेल्या निवेदनात या उद्यानात तीन किलोमीटरचा जॉगिंग ट्रॅक व्हावा. तसेच येथील टेकडीवर असलेले तारामती देवीचे खूप पुरातन देऊळ आहे. परिणामी भाविकांना सहजरीत्या देवीचे दर्शन घेता यावे यासाठी या ठिकाणी रोपवेची व्यवस्था करण्यात यावी आणि तसे केल्यास नागरिकांसाठी हे स्थळ एक चांगले पर्यटन केंद्र बनू शकेल, असा विश्वास मिहिर कोटेचा यांनी व्यक्त केला आहे.