घायाळ नाटकाचा शनिवारी प्रयोग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घायाळ नाटकाचा शनिवारी प्रयोग
घायाळ नाटकाचा शनिवारी प्रयोग

घायाळ नाटकाचा शनिवारी प्रयोग

sakal_logo
By

गोरेगाव, ता. २४ (बातमीदार) : भारताच्या फाळणीवर लेखक पु. भा. भावे यांनी लिहिलेल्या कथांवरून ‘काव्यशैली क्रिएशन्स’ या संस्थेने ‘घायाळ’ या नाटकाची निर्मिती केली आहे. संस्कार भारतीच्‍या मुंबई विभागाने शनिवारी (ता. २८) या नाटकाचा प्रयोग दुपारी ३.३० वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या सभागृहात आयोजित केला आहे. या नाटकाचे लेखन शैलेश चव्हाण यांनी; तर दिग्दर्शन कविता विभावरी यांनी केले आहे.